सासरच्या लोकांकडून सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याबाबत उरळ पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, नंदा रामदास साबळे रा. मांजरी, यांनी उरळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील रामदास साबळे यांची मुलगी जयश्री हिचा विवाह अकोला तालुक्यातील पैलपाडा येथील वसंतराव नागे यांचा मुलगा आशिष याच्याशी झाला होता. सुरुवातीला सगळं काही ठीक होत, पण नंतर तिचा छळ केला जात होता.
तिला सतत शिवीगाळ, मारहाण केली जात होती. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तसेच निवडणूकीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तीला तगादा लावत होते. यामुळे ती तणावाखाली होती.
यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उरळ पोलिसांनी पतीला अटक केली. जयश्री नागे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासरा वसंत नागे, सासू शोभा नागे आणि नणंद जयश्री सुभाष खराटे आणि वेदांती अनिल पातोंड असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, त्यांना मुलगी झाली म्हणून तिचा छळ पुन्हा वाढला. त्यानंतर ती माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतरही तिचा पती आशिष याने तीला फोनवरून पैशाची मागणी केली होती. पैसे घेऊन ये नाहीतर येऊ नको असेही तिला सांगण्यात आले.
दरम्यान, या सततच्या त्रासाला कंटाळून जयश्रीने आपल्या माहेरी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून माहेरच्या लोकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.