मी मेल्यावर तू रडशील का? तरुणाने मोबाईलवर स्टेटस ठेवत घेतला टोकाचा निर्णय…

घनसावंगी तालुक्यातील रांजणी गावात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विलास मोरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे.

त्याने ‘यहा जीने से ज्यादा मरने में विश्वास है’, मी मेल्यावर तू रडशील का ? असे स्टेट्स ठेवले होते. हा तरुण तीर्थपुरी गावात चहाचे स्टॉल चालवत होता. कष्टाळू आणि होतकरू तरुण म्हणून गावातील लोक त्याला ओळखत होते. यामुळे त्याने हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्याच्याकडे चहा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सोबत विलासचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे लोक ही त्याच्या स्टॉलवर चहा घेणे पसंद करायचे. त्याच्याकडे नेहेमी गर्दी असायची. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी त्याने दुपारच्या सुमारास ‘यहाँ जीने से ज्यादा मरने में विश्वास है’, आणि त्या नंतर त्यांनी मी मेल्यावर तू रडशील का ? अस स्टेट्स ठेवत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विलासचा मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विलासचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. विलासच्या अशा अचानक निघून जाण्याने रांजणीसह घणसांवगी आणि तीर्थपुरी गावात शोककळा पसरली आहे.