---Advertisement---

Satara News : २ तासांत लोकेशन, गुप्त माहिती कळाली; साताऱ्यातील प्रेम प्रकरणातील हत्ये प्रकरणी ६ आरोपींना अटक

---Advertisement---

Satara News : कराड येथील ओगलेवाडी परिसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना कराड शहर डीबी पथकाने दोन तासात लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.

संशयित आरोपी बाबासाहेब पवार यांची मुलगी राजमाची गावात राहणाऱ्या प्रवीण पवार याच्यासोबत पळून गेल्याचा संशय होता. त्यामुळे संशयित आरोपी हे त्या युवकाचे मागावर होते. संशयित आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातून पळून गेले होते. 

दरम्यान, याचा राग मनात धरुन बाबासाहेब पवार व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळून जाण्यास मदत केली, असा संशय असलेले मयत जनार्धन गुरव यांचे अपहरण करून सुर्ली घाटात नेऊन मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

नंतर आरोपी रानावनात पसार झाले होते. कराड शहर डी. बी. पथकाने अवघ्या दोन तासात लोकेशन व गोपनीय माहितीनुसार सहा संशयित आरोपींना अटक केली. आरोपींना सहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी ही कारवाई केली. तसेच पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पोलीस शिपाई धिरज कोरडे, महेश शिंदे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी लगेच यंत्रणा सावध केली. यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी माहितीच्या व लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी लगेच कारवाई केली आहे. आता पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---