एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली होती. अनेक आमदार खासदार शिंदे गटात गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता.
अशात आणखी काही नेते लवकरच शिंदे गटात जातील अशी चर्चा आहे. ठाकरेंच्या गटातील २ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा शिंदेंच्या एका खासदाराने केली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटातील कोणते खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार याचीही चर्चा होत आहे.
ठाकरे गटातील २ खासदार आणि ८ आमदार आमच्या संपर्कात आहे. ते लवकरच आमच्यासोबत येतील, असा दावा प्रतापराव जाधवांनी केला आहे. तसेच प्रतापराव जाधवांनी यावेळी जाणीवपूर्वकपणे त्या खासदार आणि आमदारांचे नाव घेणे टाळल्याचे दिसून आले.
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंड केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले होते. सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री झाले होते.
तसेच सत्तेत गेल्यामुळे अनेक आमदार खासदास शिंदे गटात सामील झाले होते. सध्या शिंदेंकडे १३ खासदार आहे. अशात आणखी दोन खासदार शिंदे गटात गेले तर त्यांच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.