Uday Samanta : राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल? दावोसमधून उदय सामंतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘ येत्या 15 दिवसांत…’

Uday Samanta : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यावर असलेल्या सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटातील चार आमदार आणि तीन खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेसच्या पाच आमदारांनीही शिंदेंशी भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. दावोस दौऱ्यातून मोठ्या … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे नाराज, त्यामुळेच तातडीने…

Devendra Fadnavis : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून महायुतीत पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीबाबत नाराजी व्यक्त करत थेट दिल्लीतील भाजप नेत्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश काढले. गिरीश महाजन यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती … Read more

ठाकरेंना मोठा धक्का! एकामागून एक नेत्यांनी शिवबंधन सोडलं, नाशकातील बडा नेता शिंदे गटात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना आगामी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश पुणे आणि मुंबईसह अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांनी … Read more

फडणवीसांनी शिंदेच्या ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती; आकडेवारी तपासताच दिले चौकशीचे आदेश, नक्की प्रकरण काय?

महाराष्ट्रातील शिंदे सरकारच्या काळातील एका महत्त्वाच्या निर्णयाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यावरून 2800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता. शिंदे हे त्या वेळी … Read more

मुख्यमंत्रीपद गमावले तरी शिंदेंची फडणवीसांवर मात! ‘इथे’ दाखवून दिली ताकद

मुंबईतील आझाद मैदान आज महाशपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होणार आहे. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजप नेते देवेंद्र फडणवीस घेतील, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच महायुतीतील नेते आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील. आझाद मैदानात एरवी आंदोलने व सभा पाहायला … Read more

मविआच्या सर्व नेत्यांचा शपथविधीवर बहीष्कार, मात्र शरद पवारांचा ‘हा’ आमदार खास फडणवीसांसाठी उपस्थित

महायुतीने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत मोठा विजय साजरा केला. भाजपने 132 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या विजयाच्या पार्श्वभूमीवर, आज आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस … Read more

बाळासाहेबांच्या सर्वात निष्ठावंत सेवकाचे शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला..

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीसाठी केवळ काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले असून, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकनाथ शिंदे तासाभरात निर्णय घेतील. त्यामुळे … Read more

नाराज शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी कसं केलं? फडणवीसांनी कशी काढली समजूत? वाचा इनसाईड स्टोरी

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर अखेर पडदा पडला आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या महायुती 2.0 सरकारच्या शपथविधीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली होती, परंतु भाजपने ती मान्य केली नाही. नाराजीच्या … Read more

भाजप फक्त अजितदादांसोबतही सरकार बनवू शकते, तरीही का करताहेत शिंदेंची मनधरणी? ‘ही’ आहेत खरी कारणे..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 10 दिवस उलटले असले तरी सत्तास्थापनेसाठी अद्याप हालचाली पूर्ण झालेल्या नाहीत. महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदासाठी अंतिम निर्णय घेण्यात विलंब होत आहे. भाजपच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचा दावा निश्चित मानला जात असला तरी व्यक्ती कोण हे अद्याप स्पष्ट नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा झालेली … Read more

“निदान सहा महिन्यांसाठी तरी मुख्यमंत्री बनवा”; एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी, उत्तर आले…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय आज घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव यासाठी अंतिम करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यापूर्वी मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालू ठेवले होते. २८ नोव्हेंबरला झालेल्या अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत शिंदे यांनी निदान सहा महिन्यांसाठी तरी मुख्यमंत्री पद द्यावे, अशी विनंती … Read more