राजकारण

शरद पवार गटाच ठरलं! विधानसभेची उमेदवार यादी आली समोर, दादा गटाचे टेन्शन वाढलं…

नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अनेकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

असे असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. ४० हून जास्त जागांवर शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे.

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी पुढील प्रमाणे.. इस्लामपूर – जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ – रोहित पाटील, शिराळा -मानसिंग नाईक, जुन्नर – सत्यशील शेरकर, इंदापूर – हर्षवर्धन पाटील, आंबेगाव – देवदत्त निकम, वडगाव शेरी – बापू पठारे, दौंड – रमेश आप्पा थोरात, शिरुर – अशोक पवार, उत्तर कराड – बाळासाहेब पाटील, कोरेगाव – शशिकांत शिंदे यांची नावे समोर आली आहेत.

तसेच फलटण – दीपक चव्हाण, माण खटाव – प्रभाकर देशमुख, माळशिरस – उत्तमराव जानकर, कर्जत जामखेड – रोहित पवार, काटोल – अनिल देशमुख, विक्रमगड – सुनील भुसारा, घनसावंगी – राजेश टोपे, बीड – संदीप क्षीरसागर, मुंब्रा – जितेंद्र आव्हाड, जिंतूर – विजय भांबळे, अहेरी – भाग्यश्री अत्राम, सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे.

तसेच उदगीर – सुधाकर भालेराव, घाटकोपर पूर्व – राखी जाधव, परळी -राजाभाऊ पड, लक्ष्मण पवार – गेवराई, आष्टी – भीमराव धोंडे, केज – पृथ्वीराज साठे, माजलगाव – रमेश आडसकर, राहुरी – प्राजक्त तनपुरे देवळाली – योगेश घोलप, दिंडोरी – गोकुळ झिरवाळ, मुक्ताईनगर -रोहिणी खडसे, जामनेर – गुलाबराव देवकर, अकोला -अमित भांगरे पारनेर -राणी लंके, खानापूर -सदाशिव पाटील, चंदगड – नंदाताई बाभूळकर, इचलकरंजी -मदन कारंडे

ही नावे समोर आली असून अजून अनेक जागांबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे अंतिम यादी देखील लवकरच समोर येईल. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल, असेही सांगितले जात आहे.

Related Articles

Back to top button