अजित पवारांनी क्रिकेटर सूर्याला भरला दम! विधानसभेत सर्वांसमोरच म्हणाले तुला…

भारतीय क्रिकेट टीमने नुकताच वर्ल्ड कप जिंकला. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. त्यांना बक्षीस देखील जाहीर केले.

वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी जोरदार बॅटींग केली. अजित पवारांनी तर यावेळी एक वक्तव्य केले, यामुळे सर्वजण हसू लागले. या कॅचवर सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला.

यानंतर रोहितसह अजित पवारांनी त्याची चांगली फिरकी घेतली. सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला पण यावर रोहित शर्मा म्हणाला, बर झालं तो बॉल हातात बसला नाहीतर पूढे मी त्याला बसवलं असतं, यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. सूर्याचा कॅच त्यावर रोहितची प्रतिक्रिया याची चांगलीच चर्चा झाली.

त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण रोहितच्या वक्तव्याचा धागा पकडत त्याची फिरकी घेतली. अजित पवार म्हणाले, भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. पण जर कॅच सुटला असता तर रोहितने एकट्याने नाहीतर आम्ही सर्वांनी तुला बघितलं असतं, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.

आपल्याकडे खिलाडूपणा पाहायला मिळत नसल्याचेही दादांनी सांगितले. या कार्यक्रमात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने १ कोटी बक्षील म्हणून दिले. टीम इंडियालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ११ कोटी देण्याची घोषणा केली. यामुळे मोठ्या प्रमाणावर बक्षीस टीमला देण्यात आले आहे.

टीम इंडियाने या स्पर्धेत बलाढ्य संघांना हरवून वर्ल्ड कप जिंकला. यामुळे चाहते खुश आहेत. टीमच्या कौतूकासाठी मुंबईत तसेच दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीमचं अभिनंदन केले.