शिंदे पक्ष घेऊन गेले पण ठाकरेंनी करून दाखवलं, शेवटचा धक्कादायक एक्झिट पोल आला समोर…

काही दिवसांपूर्वी शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करावी लागली. उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणाला यश मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये 21 जागांवर निवडणूक लढवली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे उद्या नेमकं काय होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आता महाराष्ट्रातील एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठी आघाडी मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेमध्ये पुढे आला आहे.

यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे दोन वर्षांपूर्वी यूपीएमध्ये सामील झाले होते. नंतर निवडणूक आयोगाने त्यांचे चिन्ह शिंदे यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला. राज्यात उद्धव ठाकरेंच्या सभा सर्वात प्रभावी झाल्या आहेत.

त्याचा फायदा त्यांना निकालात दिसेल असाही अंदाज आहे. पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. राज्यात महायुतीचा 45 जगाचा दावा फेल गेल्याचे देखील समोर येत आहे. महायुतीला २४ तर मविआला २३ जागांचा अंदाज आहे. भाजप १७, तर शिंदे गटाला ६ जागांचा अंदाज आहे.

अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय मिळेल, असेही पूढे येत आहे. मविआमध्ये काँग्रेसला ८, ठाकरे गटाला ९ जागांचा अंदाज आहे. शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे उद्या नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.