उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विद्यमान आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार, आता सगळंच गणित बदलणार…

सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे उमेदवारीसाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना ठाकरे गट पाठिंबा मिळाल्याचे समजते. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

यामुळे आता महाआघाडीकडून गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता नाशिक विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी व राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू आहे. यामध्ये अनेकजण इच्छुक आहेत.

नाशिकचे ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले उमेदवार संदीप गुळवे यांना शिवसेनेने (ठाकरे गट) पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. गुळवे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. यामुळे हे समीकरण निश्चित मानले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे.

दरम्यान, किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे गुळवे यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी ठाकरे गटामार्फत चर्चा करण्यात आली होती. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाले नाहीत. यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चारही गटांचे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातील दोन उमेदवार नगर जिल्हातून असतील, अशी चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यातून सर्व मिळून पाच जण या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांतून इच्छुक आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत चित्र स्पष्ट होईल. महायुतीमध्येच या उमेदवारीवरून संघर्षाची चिन्हे आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.