अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. येथे बाल्टिमोर, मेरीलँड येथे कंटेनर जहाज ‘फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज’वर आदळले, त्यामुळे पूल पत्त्याच्या डेकसारखा कोसळला आणि अनेक वाहने नदीत पडली आहेत.
पुलाला आदळल्यानंतर आग लागल्याने जहाजही नदीत बुडाले. बचाव कर्मचारी नदीत किमान सात जणांचा शोध घेत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, जहाज फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या एका खांबावर आदळले. यामुळे क्षणात होत्याच नव्हतं झालं.
ज्यामुळे पूल कोसळला आणि पाण्यात पडला. जहाजाला आग लागली आणि ती बुडाल्याचे दिसून आले. हा पूल 1977 मध्ये उघडला आणि पॅटापस्को नदीवर पसरलेला आहे. बाल्टिमोर बंदर तसेच पूर्व किनाऱ्यावरील शिपिंगसाठी एक महत्त्वाचा मार्ग आणि केंद्र आहे.
बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे संप्रेषण संचालक केविन कार्टराईट म्हणाले की ही आपत्कालीन परिस्थिती आहे. ते म्हणाले, आता आमचे लक्ष लोकांना वाचवणे आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढणे आहे. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे.
पुलावर काही सामान लटकल्याचे दिसून येत आहे. आपत्कालीन दल किमान सात जणांचा शोध घेत आहेत जे नदीत आहेत. सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 1.30 वाजता बाल्टिमोरमधील पुलावर जहाज आदळल्याची माहिती मिळाली.
घटनेच्या वेळी पुलावर अनेक वाहने होती. या पुलाची लांबी ३ किमी (१.६ मैल) आहे. पुलावरील अपघातानंतर सर्व लेन बंद करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, सिंगापूर ध्वजांकित ‘डाली’ कंटेनर जहाज, जे 300 मीटर लांब आहे आणि कोलंबो, श्रीलंकेकडे जात होते, तेव्हा पुलावर आदळले.