---Advertisement---

साधूच्या वेशातील व्यक्तीने ५ वर्षाच्या मुलाला उचलून आपटलं; निष्पाप चिमुकल्याचा जागीच अंत; हृदय पिळवटून टाकणारी घटना

---Advertisement---

Crime News: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे साधूच्या वेशातील एका व्यक्तीने घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाला उचलून पाय धरून जमिनीवर फेकले.

यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर लोकांनी धाव घेऊन आरोपीला पकडले. त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना मथुरेच्या गोवर्धन येथील राधाकुंडची आहे. याठिकाणी पाच वर्षांचे बालक घराबाहेर खेळत होते अशी माहिती आहे. दरम्यान, साधूच्या वेशात एक व्यक्ती तेथे आली.

त्याने मुलाला उचलले. खांद्यावर घेतले त्यानंतर मुलाचे पाय पकडून त्याला जमिनीवर फेकले. गंभीर जखमी मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून आजूबाजूचे लोक हादरले.

यानंतर स्थानिकांनी धाव घेत आरोपीला पकडले. त्याला बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथुराचे एसपी ग्रामीण त्रिगुण विशन यांनी सांगितले की, राधा कुंड परिसरात घडलेली घटना आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याचे मेडिकल केले जात आहे. मुलाचा मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे एसपींनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---