पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे, जिथे सहा सख्ख्या भावांनी सहा सख्ख्या बहिणींशी लग्न केले आहे. या सामूहिक विवाहामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च वाचवण्यात यश आले आहे.
सहा सख्खे भाऊ सहा सख्खा बहीणी लग्नाच्या असलेले स्थळ शोधत होते. यामुळे सर्वात मोठ्या भावाला खूप काळ वाट पहावी लागली होती. सहा सख्ख्या बहिणी एकाच घरात शोधून सापडत नव्हत्या. असल्या तरी कोणाचे ना कोणाचे लग्न झालेले होते किंवा वयाने खूपच लहान होत्या.
तसेच वरांकडे देखील सर्वात छोट्या भावाची अडचण होती. तो वयात आला नव्हता. यामुळे सर्वात मोठ्याला अनेक वर्षे लग्नासाठी वाट पहावी लागली. इतरांचेही तेच झाले. लग्नासाठी कोणताही मोठा लवाजमा न बोलावता साध्या पद्धतीने फक्त 100 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या विवाहसोहळ्यासाठी एक लाख पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले, तसेच वधुपक्षाकडून कोणताही हुंडा घेण्यात आला नाही. मोठ्या भावाने सांगितले की, त्यांना कोणत्याही पक्षावर आर्थिक बोजा टाकायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी हा साधेपणा स्वीकारला.
या सहा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा स्थानिक समाजात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण त्यातून खर्चाच्या दडपणाशिवाय आनंदाचा मार्ग शोधण्यात यश आले आहे.