6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा तो व्हिडिओ, न्यायाधीश चक्रावले, नेमकं घडलं काय?

नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील उरण पोलिसांनी एका 25 वर्षीय महिलेला आणि तिच्या 35 वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तिच्या 6 वर्षीय मुलाला प्रियकराबरोबरचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यास भाग पाडले, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

याबाबत पनवेल सत्र न्यायालयाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये महिलेने तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. यामुळे तिने हे मुद्दाम केले की तेच खरे आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत एक व्हिडीओ कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आला.

दरम्यान, कोर्टाने या महिलेला व्हिडीओ कोणी शूट केला आहे याबद्दल विचारले. नंतर महिलेने हा व्हिडीओ तिच्या मुलाने शूट केल्याचे सांगितले. याबाबत मुलाने ‘काकांच्या (महिलेच्या प्रियकराच्या) सांगण्यावरुन मी हा व्हिडीओ शूट केला, असं सांगितले. हा व्हिडिओ अश्लील होता. यामध्ये नको त्या अवस्थेत चित्रीकरण आहे.

कोर्टासमोर आरोपीला जामीन देण्यासंदर्भातील याचिकेची सुनावणी सुरु असताना हा खुलासा झाला. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील तपास करण्याचे देखील आदेश दिले आहेत. तसेच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या मुलाला 6 महिन्यांपूर्वी सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. लहान मुलाला लैंगिक संबंध ठेवत असल्याचा व्हिडीओ शूट करायला लावल्याप्रकरणी सदर महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अनैतिक संबंध तसेच लग्नानंतर देखील अशा अनेक प्रकारे अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे अनेकांच्या घरात वाद होत असल्याची अनेक प्रकरणे आहेत. यामुळे याबाबत कोर्टाने वेगवेगळी प्रकरणे उघडकीस आली आहेत.