7 फ्लॅट, 17 लाखाच घड्याळ, करोडोंची मालमत्ता? IAS प्रोबेशनर पूजा खेडकरच सगळंच उघड झालं…

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती सध्या वादाचा विषय ठरली आहे. त्यांच्याबाबत आता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या या क्षेत्रातील सुरुवात देखील वादग्रस्त आणि संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. पूजा खेडकर या IAS कशा झाल्या यावरुनच वाद आहे.

प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर नजरेत आल्या. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिवांना पाठवल्यानंतर आता पूजा खेडकर यांची वाशीमला बदली झाली आहे. यानंतर त्या खऱ्या अर्थाने चर्चेत आल्या.

आता डॉ. पूजा खेडकर यांच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून ११० एकर शेतजमीन आहे.

यामुळे हे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. १.६ लाख चौरस फुटाची ६ दुकान आहेत. ७ फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. तसेच ९०० ग्रॅम सोने, हिरे, १७ लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे. ४ कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे.

तसेच पूजाकडे १७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे याची याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.