सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीचा अभ्यास लक्षात घेता आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत आहेत. महायुतीमध्ये यावेळी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन महत्त्वाचे घटक पक्ष आहेत.
यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीला मंत्र्यांसह कोर कमिटीचे सदस्य देखील उपस्थिती होते.
दरम्यान, या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत बोलताना महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता अजित पवार बाहेर पडणार यावर उत्तर मिळाले आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले, महायुतीमधील तीनही पक्ष विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार आहेत. जागा वाटप लवकरच केले जाईल, विधानसभेला तिन्ही पक्ष एकत्रित सामारे जातील. अशी घोषणाच त्यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेला राष्ट्रवादी पक्ष ८५ जागा घेणारच असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच मित्र पक्षांबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचनाही अजित पवार यांनी आपल्या सर्व आमदार आणि प्रवक्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त फटका अजित पवारांना बसला. यामुळे आता ते जोमाने तयारीला लागले आहेत. अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे फिरणार असल्याची देखील माहिती आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात.