४१ वर्षीय श्रीलंकन माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशनावर राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या. काही अज्ञात इसमांनी निरोशनावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. निरोशनावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते घरी एकटे नव्हते.
हा हल्ला झाला तेव्हा निरोशनासोबत त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुलेही तेव्हा घरात उपस्थित होती. पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे कुटूंब एकच हादरले होते. घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली, तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.
हल्लेखोराने हा हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहे. आरोपी सध्या फरार आहे. निरोशना यांनी श्रीलंकेकडून खेळताना श्रीलंका संघाचे नेतृत्वही केले आहे. श्रीलंकेच्या अंडर-१९ वर्ल्ड कप संघाची धुरा त्यांनी संभाळली होती. तो एक लोकप्रिय खेळाडू होता.
निरोशना यांनी दहा सामन्यात संघाचे नेतृत्वही केले आहे. क्रिकेटची आवड असल्याने शालेय क्रिकेट संघाची धुरा निरोशना यांच्या हाती सोपवण्यात आली होती. देशांतर्गत क्रिकेटसाठी निरोशना हे चिलावा मरिन्स क्रिकेट क्लब आणि गल्ले क्रिकेट क्लबकडून खेळले. त्यांनी अनेक सामने जिंकून दिले आहेत.
निरोशना हे उत्कृष्ट गोलंदाज होते, मोठ्या खेळाडूंना ते आस्मान दाखवत होते. त्यांनी प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि अंडर-१९साठी सरासरी ३०च्या खाली गोलंदाजी केली आहे. निरोशना यांनी १२ सामन्यात २६९ धावा केल्या असून १९ बळी घेतले आहेत.
दरम्यान, या घटनेवर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील क्रिकेटप्रेमी करत आहेत. याबाबत पोलिसांनी काही संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे.