अखेर नताशा-हार्दिक प्रेमकहाणीचा शेवट, स्वतःच केलं जाहीर, मुलाबाबत घेतला मोठा निर्णय…

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द हार्दिक-नताशाने हे गुपित उघड करत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यासोबतच दोघांनी घटस्फोटाच्या बातमीच्या दुजोरा दिला. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नतासा स्टॅनकोविच परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. आयपीएल 2024 पासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. T20 विश्वचषकादरम्यानही नताशा विजयाच्या सेलिब्रेशनपासून दूर दिसली होती.

अनंत अंबानींच्या लग्नातही हार्दिक एकटाच दिसला होता. आता दोघांनी घटस्फोटाला दुजोरा दिला आहे. हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही हे नाते जतन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि आमचे सर्वस्व दिले, पण आता आम्हाला वाटते की हे आम्हा दोघांसाठी योग्य निर्णय आहे. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता, एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास, जे काही आम्ही एकत्र घालवले आणि आनंद लुटला, आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो.

त्यांचा मुलगा अगस्त्य कोण वाढवणार हेही दोघांनी सांगितले आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकचे लग्न केवळ 4 वर्षे टिकले. 31 मे 2020 रोजी दोघांचे लग्न झाले. नताशा काही दिवसांपूर्वी तिची बॅग पॅक करून तिच्या पालकांकडे गेली होती.

हार्दिक जेव्हापासून आयपीएलमध्ये खेळत होता तेव्हापासून त्याचे आणि नताशाचे नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवत होते. हार्दिक आणि नताशाने गुरुवारी इन्स्टाग्रामवर विभक्त झाल्याची माहिती शेअर केली. दोघांनीही हीच पोस्ट त्यांच्या वॉलवर शेअर केली आहे. यानंतर हार्दिक आणि नताशाने कमेंट सेक्शन बंद केले आहे.