सध्या राज्यातील सर्व पक्ष, महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात्रा योजना काढून जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापासूनच प्रचार केला जात आहे.
असे असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे. राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राजकीय लोकांचे याकडे लक्ष लागले आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि प्रत्येक पक्षाला किती जागा आणि किती टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओपिनियन पोलमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम कसे आहे? यावर देखील प्रतिक्रिया आल्या आहेत.
यामध्ये ३५ टक्के लोकांनी खुप चांगले काम असल्याचे उत्तर दिले आहे. २१ टक्के लोकांनी सरासरी तर ३० टक्के लोकांनी चांगले नाही असे मत नोंदवले आहे. यामुळे संमिश्र प्रतिक्रिया यावेळी लोकांनी दिल्या आहेत. यामुळे याचा मतांवर किती परिणाम होईल, हे लवकरच समजेल.
समोर आलेल्या पोलनुसार भाजपला २०१९ मध्ये मिळालेल्या जागा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आज निवडणुका झाल्यास भाजपला ९५ ते १०५ जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. राज्यात या सर्वाधिक जागा असतील असेही म्हटले जात आहे. त्यांना बहुमतासाठी त्यांना अन्य पक्षांची मदत लागले.
तसेच एकनाथ शिंदे यांना 20 जागा मिळतील. अजित पवार यांना 10, काँग्रेस 40, उद्धव ठाकरे 30, शरद पवार 40, तसेच अन्य 20 असा आसपासचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत अंदाज वेगळे आणि निकाल वेगळा लागला होता, आता नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.