सध्या राज्यातील सर्व पक्ष, महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात्रा योजना काढून जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापासूनच प्रचार केला जात आहे.
असे असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे. राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राजकीय लोकांचे याकडे लक्ष लागले आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि प्रत्येक पक्षाला किती जागा आणि किती टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळतील अशी शक्यता आहे.
यामुळे त्यांची सत्ता येईल असे सांगितले जात आहे. तसेच महायुतीला 120 जागा मिळतील असेही सांगितले जात आहे. यामुळे जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. लोकांना फोडाफोडी आवडली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे बोलले जात आहे.
तसेच राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? याची चर्चा सुरू झाली आहे.
ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे. तसेच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.