राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच आता मराठवाड्यात काँग्रेसला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आमदार जितेश अंतापूरकर यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा राजीनामा दिल्यानंतर, अंतापूरकर हे भाजपात सामील होणार आहेत. अंतापूरकर यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करण्याचे आरोप झाले होते. अंतापूरकर हे भाजप नेते अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी अनेकदा पक्षाविरोध काम केले असल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे कारण त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसची एक मजबूत ताकद कमी होईल. या धक्क्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पूर्वीच काँग्रेसने अशोक चव्हाण, बसवराज पाटील आणि अर्चना चाकूरकर यांना सोडचिठ्ठी दिली आहे. आता अंतापूरकर यांची सोडचिठ्ठी ही त्याच कडीचा एक भाग आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसला मोठे नेतृत्व राहिले नाही.
काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता, अशी माहिती आहे.