राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काहींनी या योजनेचे स्वागत केले तर काहींनी टीका केली. सरकारच्या दीड हजारांच्या मदतीत काय होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली जात होती. आता आता एक गोष्ट समोर आली आहे.
याचे कारण म्हणजे प्रणाली बारड. या लाडक्या बहिणीने चोख उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी दहा हजारांची कमाई केली. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचे विशेष कौतुक केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रणाली बारड यांनी गणेशोत्सवातील आरतीवेळी वापरात येणाऱ्या हस्त घुंगराचा व्यवसाय सुरू केला. समाजमाध्यमवरही त्यांनी या घुंगराच्या व्यवसायाची जाहिरात केली होती. केवळ दीड हजाराच्या भांडवलात त्यांनी मोजक्या दिवसात दहा हजार रुपयांची कमाई केली. यामुळे त्यांना आपला हक्काचा व्यवसाय मिळाला आहे.
यातून त्यांना चार पैसे मिळणार आहेत. प्रणाली बारड यांनी सांगितलं, की मुख्यमंत्र्यांनी स्वतः माझ्याजवळील घुंगरू विकत घेऊन माझे मनोबल वाढवले आहे. लाडक्या बहिणींना माझे सांगणे आहे की, मिळालेल्या पैश्यांचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवता येऊ शकते. यामुळे याचा विचार सर्वांनी करावा.
तसेच आपल्यातली कला आणि कौशल्य यासह समाजमाध्यमाची साथ घेतली, तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीने कष्टाचे आणि समय सूचकतेचे तोंड भरून कौतुक केले.
दरम्यान, महिलांनी अशाच प्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून व्यवसाय केला, तर अनेक महिलांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. यामुळे इतर महिलांसाठी हा एक चांगला आदर्श आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.