बंगळुरूतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कार्यरत एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येने देशभरात खळबळ उडवली आहे. अतुलने आत्महत्येपूर्वी 24 पानांची चिठ्ठी आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. या दोन्ही माध्यमांतून त्यांनी पत्नी निकिता सिंघानिया, तिच्या कुटुंबीयांवर, आणि न्यायालयीन प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्नीचा छळ आणि खोट्या आरोपांचा सामना 2019 साली मॅट्रिमोनियल साइटद्वारे अतुल आणि निकिताची ओळख झाली होती. त्यांच्या लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते. मात्र, मूल झाल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले. निकिता तिच्या मुलासह जौनपूरला परत गेली आणि अतुल व त्यांच्या कुटुंबावर हुंडाबळी, मारहाण, आणि इतर 9 गुन्हे दाखल केले.
यामुळे अतुलला 2 वर्षांत 120 वेळा न्यायालयात हजर व्हावे लागले.पोटगीसाठी प्रचंड आर्थिक मागणी निकिताने अतुलकडून दरमहा 40,000 रुपये पोटगी घेतली होती, परंतु त्याच्यासाठी 3 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. निकिता Accenture कंपनीत काम करत होती आणि दरमहा 78,245 रुपये वेतन मिळवत होती.
तरीही, तिने पोटगीसाठी प्रचंड आर्थिक तडजोडीची मागणी केली होती, असे अतुलने आत्महत्येपूर्वी सांगितले. अतुलने चिठ्ठीत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रीता कौशिक यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला. निकिता त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होती, असेही त्यांनी नमूद केले.सोशल मीडियावर न्यायाची मागणी
अतुलच्या मृत्यूनंतर LinkedIn आणि X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. #Mens Mental Health, #JusticeForAtul, आणि #SupportEach Other अशा हॅशटॅगद्वारे लोक न्यायाची मागणी करत आहेत.
अतुल सुभाष यांच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीच्या आत्महत्येमुळे, समाजातील पुरुषांवरील अन्यायकारक आरोप व व्यवस्थेतील त्रुटी याविषयी देशव्यापी चर्चा सुरू झाली आहे. घटनाक्रमाने मानसिक आरोग्य, खोट्या आरोपांची गंभीरता, आणि न्यायप्रक्रियेतील सुधारणांची गरज अधोरेखित केली आहे.