पती-पत्नीच्या शांत सहजीवनात अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. भोपाळच्या छोला भागात, २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती-पत्नी नेहमीप्रमाणे एकत्र जेवून झोपले होते, मात्र सकाळी पतीने पत्नीला फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिले, ज्याने त्याला मोठा धक्का बसला.
महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तो ऑफिसवरुन आल्यानंतर तो पत्नीसोबत जेवला, दोघं एकत्र झोपलेही. पण सकाळी ४ वाजता त्याला जाग आली, त्यावेळी पत्नी फासाला लटकलेल्या अवस्थेत त्याला दिसली. हे दृष्य पाहून तो हादरला. त्याने तात्काळ कुटुंबिय आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
भोपाळमधील छोला या भागात हा प्रकार घडला. २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. १८ फ्रेबुवारी रोजी दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती. नुकतंच ९ नोव्हेंबर रोजी महिलेच्या सासरच्या लोकांनी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
मृत महिलेला पती आकाश हा प्रायव्हेट नोकरी करत आहे. तर २२ वर्षीय खुशी घरातच डान्स क्लास घेत होती. दोघांमध्ये कधीही वाद नव्हता. मात्र तिने अशाप्रकारे उचललेल्या टोकाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. खुशी कोणत्या तणावात होती का? किंवा काही समस्या होती याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनास्थळी सुसाइड नोट आढळली नाही. मृत महिलेला कोणता तणाव होता का, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. तिने कोणालाही काही सांगितले नसल्याने आणि पती वा सासरच्या मंडळींवर कोणतेही आरोप नसल्याने पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.