केरळच्या पथानामिथिट्टा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका 18 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 62 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना दोन वर्षांच्या काळात घडली असून, त्यामध्ये मुलीच्या शेजाऱ्याने सर्वात पहिला अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
पीडित मुलीने स्वतःच तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार, तिच्यावर 13 वर्षांची असताना अत्याचार सुरू झाला होता. मुलीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, ज्या-ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिला, त्या प्रत्येकाने मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना ताब्यात घेतले आहे आणि इतर आरोपींच्या शोधात आहेत.
प्रकरण कसे उजेडात आले? बाल कल्याण समितीने आयोजित केलेल्या एका काऊन्सिलिंग कार्यक्रमात मुलीच्या शिक्षकांनी तिच्या बदललेल्या वागण्या विषयी समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर बाल कल्याण समितीने पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती करून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पोलीस कारवाई: पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केरळच्या महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आगामी तीन दिवसांत कारवाई करून रिपोर्ट मागितली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे आणि भविष्यात या प्रकरणात नेमकं काय समोर येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.