बीडमध्ये मोठ्या हालचाली, संतोष देशमुखांच्या भावाची स्वताचे जीवन संपवणण्याची घोषणा, कारणही सांगीतले

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता एक महिना पुर्ण होईन गेला आहे, परंतु आरोपींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक गंभीर निर्णय घेतला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, “खून प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सीआयडीने ३१ डिसेंबरला पहिल्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

“वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने आणि ३०२ मध्ये आरोपी न केल्याने धनंजय देशमुख यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

“जर या आरोपीला मोक्का आणि ३०२ आरोपामध्ये नाही घेतलं तर माझ्या कुटुंबाचं मोबाईल टॉवर आंदोलन असेल, त्या टॉवरवर मी स्वत:ला संपून घेतो. हे आरोपी सोडले तर माझा हे खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल.

माझ्या भावालाही वाटेल की, आपला भाऊ स्वत:संपला. त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही,” असं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं.

धनंजय देशमुख म्हणाले, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी केली होती, परंतु यंत्रणा आम्हाला तपासाची माहिती देत नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला दूर ठेवलं जात आहे. मी आणि माझे कुटुंबिय गांभीर्यपूर्वक हा निर्णय घेत आहे, सकाळी १० वाजता मी टॉवरवर जाणार आणि संपून घेणार आहे. मला सगळ्यांपासून भीती आहे.”

प्रकरणाची पार्श्वभूमी

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचा तात्कालिन तालुकाध्यक्ष आहेत. आरोपींना मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु वाल्मिक कराड याच्यावर अद्याप मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही.