बंगला नाही गाडी नाही, घरात फक्त ३ भांडी अन्… अचानक का बदलली आमिरचा भाचा इमरानची लाईफस्टाईल

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इम्रान खानच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, तो कोणत्या चित्रपटातून परतणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमिर खानचा भाचा असलेल्या इम्रानने चित्रपटसृष्टी, लाइमलाइट, आणि सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर आता पुनरागमनाचा निर्णय घेतला आहे.

आयरा खानच्या लग्नात धमाल केल्यानंतर, इम्रानने अलीकडील मुलाखतीत आपले बदललेले आयुष्य आणि जीवनशैली कशी बदलली आहे याबद्दल उघडपणे सांगितले आहे. इम्रान खानचा बॉलिवूडमधील इतर कलाकारांपेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे.

२०१६ पासून तो स्वतःच्याच केसांची कटिंग स्वतः करतो आणि तोच चष्मा गेली १० वर्षांपासून वापरत आहे. तसेच, त्याचाच जुना सूट अजूनही वापरतो. आयरा खानच्या लग्नात तो याच साध्या लूकमध्ये दिसला होता. ट्रेंडी कपड्यांऐवजी इम्रान नेहमीच क्लासिक फॅशनमध्ये दिसतो.

इम्रानने शाश्वत जीवनशैलीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपली फेरारी विकून साधी फोक्सवॅगन घेतली आहे आणि आलिशान पाली हिल बंगला सोडून वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये राहायला गेला आहे. त्याच्या नवीन साध्या जीवनशैलीत फक्त तीन प्लेट्स, तीन काटे चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राईंग पॅन यांचा समावेश आहे.

पूर्वी फोनवर सतत व्यस्त असणाऱ्या इम्रानने आता आपली जीवनशैली बदलली आहे आणि तो फोनपासून दूर राहतो. इम्रान सध्या लेखा वॉशिंग्टनला डेट करत असून, पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त झाल्यानंतर मुलगी इमारा याची काळजी घेत आहे. इम्रानने ‘जाने तू या जाने ना’, ‘डेल्ही बेली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, आणि ‘कट्टी बट्टी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्याचे चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे.