महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविक आणि साधूंनी स्नान केले. याचदरम्यान, महाकुंभमेळ्यात एका सुंदर साध्वीची उपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली. सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले आणि सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले.
ती तरुणी स्वतःला साध्वी असल्याचे सांगत होती, मात्र लवकरच तिचे खरे रूप समोर आले. प्रसारमाध्यमांनी तिचा इंटरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली असता, काही युजर्सनी ती साध्वी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारिया असल्याचे उघड केले.
हर्षा बऱ्याच काळापासून इन्स्टाग्रामवर धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर कंटेंट तयार करत असते. तसेच, ती मेकअप आणि इतर शो होस्ट करण्याचे व्हिडीओही पोस्ट करत असते.
एक्सवर (ट्विटर) युजर्सनी हर्षाची पोलखोल केली. एका युजरने विचारले की, दोन महिन्यांपूर्वी इव्हेंट होस्ट करणारी हर्षा अचानक साध्वी कशी काय झाली? दुसऱ्या एका युजरने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट टॅग करत तिला सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला.
हर्षाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरी जी महाराज यांची शिष्या असल्याचे नमूद केले आहे. तिच्या प्रोफाइलवर ती धार्मिक विषयांवर सामग्री तयार करत असल्याचे दिसते.