सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला! मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती आली समोर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर तब्बल 6 वार केले असून, दोन जखमा खोलवर आहेत. त्यातल्या एका जखमेचे ठिकाण सैफच्या मनक्यावर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सैफसोबत मोलकरणीवर देखील हल्ला झाला असून तिच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.

मोलकरणीचा जबाब आणि धक्कादायक माहिती समोर

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सैफच्या मोलकरणीचा जबाब नोंदवला आहे, ज्यातून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, काल रात्री एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीसोबत जोरदार वाद घालू लागला. सैफने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी त्या व्यक्तीने सैफवरच हल्ला केला.

मुंबई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करणाऱ्या मुख्य गुन्हेगाराला पकडण्यासाठी तपास सुरू आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि त्याच्या घरातील नोकराने पहाटे ३.३० वाजता त्याला रुग्णालयात आणले.

लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितले की, “सैफ अली खान यांना पहाटे ३:३० वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या शरीरावर चाकूचे सहा जखमा आहेत, त्यापैकी दोन खोल आहेत. एक दुखापत त्याच्या मणक्याजवळ आहे. शस्त्रक्रियेनंतरच आम्ही त्याच्या दुखापतीची तीव्रता तपासू शकू.”

करीना कपूरच्या टीमचे निवेदन

करीना कपूर खानच्या टीमने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “सैफ आणि करीनाच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये सैफच्या हाताला दुखापत झाली होती. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत.” त्यांनी माध्यमांना आणि चाहत्यांना आवाहन केले की, “कृपया धीर धरा आणि कोणत्याही अफवा टाळा. पोलीस तपास करत आहेत. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद.”

हल्ला कसा झाला? पोलिस तपासात गुंतले

प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्याचे सैफशी भांडण झाले, ज्यामध्ये सैफला चाकूने जखमा झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्यही घरात उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तथापि, घुसखोराचा घरात चोरी करण्याचा हेतू होता की आणखी काही याचा तपास पोलिस अजूनही करत आहेत.

वृत्तानुसार, चोराला सर्वात आधी मोलकरणीने पाहिले. दोघांमध्ये वाद झाला आणि जेव्हा अभिनेत्याने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा घुसखोराने त्याच्यावर अनेक वार केले.