Saif Ali Khan : मोठी बातमी! सैफवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराची ओळख पटली, अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री एका हल्लेखोराने चाकूने तब्बल सहा वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

या घटनेने बॉलिवूडसह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी सैफचे(Saif Ali Khan) संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, सैफवर हल्ला करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावर यापूर्वी घरफोडी आणि चोऱ्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सैफ अली खान(Saif Ali Khan) याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटोही समोर आलाय. हा एक सराईत गुन्हेगार आहे. यानेच सैफ अली खान याच्यावर सपासप सहा वार केले. आरोपीने सैफच्या घराची रेकी करून घरात प्रवेश केला होता. शेजारील इमारतीच्या मदतीने त्याने सैफच्या घरात घुसखोरी केली.

पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे. सैफवर हल्ला हा चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हा हल्ला एकट्याने केला की आणखी कोणी सहभागी होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.