Santosh Deshmukh murder case : बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या हत्येमागील कटाच्या संदर्भात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी नांदूरा फाटा परिसरातील एका ढाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट आखल्याचे उघड झाले आहे.
हत्येचा कट आणि घटनाक्रम:
8 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी नांदूरा फाटा परिसरातील ढाब्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर 9 डिसेंबरला कटानुसार सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. 14 जानेवारीला संबंधित ढाबा चालकाची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये कट रचल्याची माहिती समोर आली.
कटात इतरांचीही सहभागाची शक्यता:
हत्येच्या कटात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिस सध्या या कटात इतर कोणाचा सहभाग होता याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींबरोबरच या कटात सहभागी असलेल्या इतरांचीही चौकशी करून त्यांना अटक करणे आवश्यक आहे.
सरपंच देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कटाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि आरोपींनी या घटनेत कशा प्रकारे सहभाग घेतला याचा सखोल तपास सुरु आहे.`AQ