Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वादळी खेळी रेकाॅर्डनी गाजली, वानखेडेवर झाले ‘हे’ १० विश्वविक्रम

Abhishek Sharma : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने धडाकेबाज खेळी करत क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावत त्याने भारतासाठी दुसऱ्या सर्वात वेगवान टी-२० शतकाचा विक्रम केला. या तुफानी खेळीदरम्यान अभिषेकने अर्धा डझनहून अधिक विक्रम मोडीत काढले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे उध्वस्त केले.

टीम इंडियासाठी दुसरे सर्वात वेगवान टी-२० शतक

अभिषेकने ३७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत रोहित शर्माच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला. भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक रोहित शर्माने ३५ चेंडूत झळकावले आहे. मात्र, अभिषेकची ही खेळी टीम इंडियाच्या टी-२० इतिहासातील सर्वात संस्मरणीय खेळ्यांपैकी एक ठरली आहे.

क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडला

अभिषेकने टी-२० क्रिकेटमध्ये १०.१ षटकांत शतक झळकावण्याचा अनोखा पराक्रम केला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०.२ षटकांत शतक ठोकले होते.

पॉवर प्लेमध्ये अर्धशतक – वेगवान खेळीचा नवा टप्पा

अभिषेक शर्माने आपल्या शतकी खेळीच्या आधीच फक्त १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे भारताच्या टी-२० क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे, त्याने हे अर्धशतक पॉवर प्लेमध्ये झळकावले, त्यामुळे हा विक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो. या बाबतीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानावर आहे.

पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाचा सर्वोच्च धावसंख्या विक्रम

अभिषेकच्या आक्रमक खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये ९५ धावा फक्त १ गड्याच्या मोबदल्यात जमवल्या, जो भारतीय संघासाठी नवीन विक्रम आहे. यापूर्वी भारताने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या.

टी-२० मध्ये सिक्सरचा विक्रम

अभिषेकने या सामन्यात १३ षटकार ठोकत भारताकडून टी-२० सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. या सामन्यात त्याने १५ धावांची खेळी करत जबरदस्त फटकेबाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना हादरवून सोडले.

अभिषेक शर्माची ही तुफानी खेळी भारतीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला असून, त्याने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत.