Gajanan Maharaj : गजानन महाराज प्रकट दिनी शेगावला जाणार का? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी
Gajanan Maharaj : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन २० फेब्रुवारी रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे. यावर्षी प्रगट दिन गुरुवारी आल्याने भक्तांसाठी विशेष संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातील हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल होत आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दर्शन व्यवस्था
गजानन महाराज संस्थानने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी मंदिर संपूर्ण रात्री दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरा येणाऱ्या भाविकांनाही श्रींचे दर्शन घेता येणार आहे.
प्रगट दिन सोहळ्यातील विशेष कार्यक्रम
२० फेब्रुवारी:
- सकाळी १० ते १२: हभप भरत बुवा पाटील म्हैसवाडी यांचे कीर्तन
- सकाळी १० वाजता: श्री महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहूती आणि अवभृतस्नान
- दुपारी ४ वाजता: श्रींच्या पालखी मिरवणुकीची सुरुवात (अश्व, रथ आणि मेणा परिक्रमा)
२१ फेब्रुवारी:
- सकाळी ७ ते ८: हभप श्रीराम बुवा ठाकरे (लातूर) यांचे काल्याचे कीर्तन – प्रगट दिन सोहळ्याची सांगता
श्री संस्थानतर्फे विशेष सुविधा आणि व्यवस्था
- महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात भजनी दिंड्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेगावमध्ये दाखल होत आहेत.
- श्री संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी विशेष एकेरी मार्ग निश्चित केला असून, दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग आणि औदुंबर दर्शन व्यवस्था केली आहे.
- संस्थानच्या भक्त निवासात अल्पदरात राहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
श्रींच्या भक्तांसाठी सेवेकरी तत्पर
मंदिर परिसरात स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन ठेवण्यात आले असून, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपल्या सेवेत तत्पर आहेत. संपूर्ण शेगाव शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे आणि लाखो भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.