Sourav Ganguly : ब्रेकींग! सौरभ गांगुलींच्या कारचा मोठा अपघात, ट्रक अचानक समोर आला अन्..
Sourav Ganguly : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या ताफ्यातील एका गाडीचा हुगळीतील दादपूर येथे दुर्गापूर एक्सप्रेस वे वर अपघात झाला. गुरुवारी बर्दवानकडे जात असताना हा प्रकार घडला. पावसाच्या सरींमध्ये समोर आलेल्या एका लॉरीमुळे ताफ्यातील गाड्यांना अचानक ब्रेक लावावे लागले आणि मागून येणाऱ्या दोन वाहनांची किरकोळ धडक झाली. महत्वाचे म्हणजे सौरव गांगुली आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही.
कसा घडला अपघात?
घटनेच्या वेळी पाऊस पडत असल्याने रस्ता ओलसर होता. अचानक समोर आलेल्या लॉरीने जोरात ब्रेक लावल्यामुळे गांगुली यांच्या गाडीच्या चालकाला त्वरित ब्रेक दाबावा लागला. त्यामुळे ताफ्यामागून येणाऱ्या दोन गाड्यांमध्ये किरकोळ धडक झाली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
गांगुलींची प्रकृती आणि वाहनांचे नुकसान
दादपूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुली यांच्या वाहनाला कोणतेही नुकसान झाले नाही तसेच ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. या अपघातात ताफ्यातील दोन वाहनांना किरकोळ नुकसान झाले असले तरी कोणत्याही चालकाला दुखापत झालेली नाही.
बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशनकडून सन्मान
हा अपघात घडण्यापूर्वी सौरव गांगुली बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गांगुलींनी आपल्या भाषणात बर्दवानमधील खेळाडू घडवण्याच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करत जिल्ह्यातून अधिकाधिक क्रिकेटपटू तयार होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे मत मांडले.
सुदैवाने अपघात मोठा टळला
हा अपघात जरी धक्कादायक असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याने चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. गांगुली पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांच्या ताफ्यातील अन्य सदस्यांनाही कोणतीही इजा झालेली नाही.