ताज्या बातम्याक्राईम

Nagpur : आईसोबत मुलीलाही प्रेमाच्या जाळ्यात फसवून केले अत्याचार, व्हिडिओ काढला अन्…, नागपूर हादरले

Nagpur : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीने महिलेचे आणि तिच्या तरुण मुलीचे लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने दोघींचे आक्षेपार्ह व्हिडीओ मोबाईलद्वारे शूट करून समाजमाध्यमांवर व्हायरल केले आणि पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी ४२ वर्षीय चालक आहे.

कशाप्रकारे घडली ही घटना?
ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला दोन मुलींसमवेत राहते. सुमारे दहा वर्षांपूर्वी तिची आरोपी चालकाशी ओळख झाली. आरोपीने प्रेमाचे नाटक करत महिलेचे लैंगिक शोषण केले. काही काळानंतर त्याने तिच्या २० वर्षीय मुलीला देखील प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिच्यावरही बलात्कार केला.

या संपूर्ण प्रकाराचे आरोपीने मोबाईलद्वारे व्हिडीओ शूट केले. त्यानंतर या व्हिडीओंचा वापर करून तो दोघींना ब्लॅकमेल करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने हे आक्षेपार्ह व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल केले. हे व्हिडीओ पीडित महिलेच्या लहान मुलीच्या नजरेस पडले. तिने घडलेला प्रकार आई आणि बहिणीला सांगितला, त्यानंतर महिलेकडून जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सुरक्षा हा गंभीर प्रश्न बनला आहे. याआधीही अशाच स्वरूपाची एक घटना मुंबईत समोर आली होती, जिथे दिल्ली क्राइम ब्रांचचा सायबर सिक्युरिटी ऑफिसर असल्याचे सांगून एका व्यक्तीने उच्चभ्रू सोसायटीतील तरुणींना फसवले होते. या प्रकरणात आरोपी महिलांना महागड्या भेटवस्तू देऊन आपल्या जाळ्यात अडकवत असे, त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करून आर्थिक फसवणूक करीत असे. पोलिसांनी तपास करून आरोपीला गुजरातमधून अटक केली होती.

नागपूर घटनेतील आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे.

Related Articles

Back to top button