ताज्या बातम्याआरोग्य

sangli : खून झाला, खून झाला जिल्हा हादरला; पोलिस तपासातून भलतंच सत्य आलं समोर, सांगलीकर सावधान..

sangli : सांगली शहरातील हिराबाग कॉर्नर येथे एका तरुणाच्या खुनाची अफवा सोमवारी संपूर्ण शहरात वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक सत्य समोर आले – हा खून नसून उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

उष्णतेचा फटका – रक्ताच्या उलट्यांमुळे मृत्यू

मृत व्यक्तीची ओळख रामपाल निषाध (परप्रांतीय, आयस्क्रीम विक्रेता) अशी झाली आहे. गेली २० वर्षे ते सांगलीत वास्तव्यास होते. सोमवारी, हिराबाग परिसरात आयस्क्रीम विकत असताना अचानक त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हत्या झाल्याची अफवा पसरवली, त्यामुळे मोठी गर्दी झाली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

सांगलीत गुन्हेगारी वाढली – दोन दिवसांत दोन खून

गेल्या दोन दिवसांत सांगलीत दोन खून झाल्याने शहर हादरले आहे.

  1. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला.
  2. मिरजमध्ये गॅंगवॉरमधून एका तरुणाची हत्या झाली.

या घटनांमुळे शहरात भीतीचं वातावरण असतानाच, हिराबागमध्येही खून झाल्याची अफवा पसरली. मात्र, पोलिसांनी वेळीच वस्तुस्थिती स्पष्ट केली, आणि हा मृत्यू उष्णतेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.

Related Articles

Back to top button