Naupada : मुंबई हादरली! जन्मदात्या आई आणि आजीनेच केली मुलीची हत्या; धक्कादासक कारण आले समोर

Naupada : ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नौपाडा येथील गावदेवी परिसरात एका दिव्यांग तरुणीची तिच्याच आई आणि आजीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आजीला अटक केली असून, आई अद्याप फरार आहे.

यशस्वी पवार ही जन्मतः दिव्यांग आणि गतिमंद होती. तिच्या त्रासाला कंटाळून आई आणि आजीने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन 19 फेब्रुवारी रोजी ठार मारले. या घटनेबाबत मुलीच्या मावस आत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हत्यानंतर आई आणि आजीने मृतदेह चादरीत गुंडाळून चारचाकी गाडीत टाकून नेल्याचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी मुलीच्या आजीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने संपूर्ण सत्य उघड केले.

पीडित तरुणी दीर्घकाळ आजारी होती आणि 15 फेब्रुवारीपासून तिच्या तब्येतीत अधिक बिघाड झाला होता. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी तिला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. 20 फेब्रुवारीला तिच्या मृतदेहावर सातारा जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.