शरद पवार vs अजित पवार! कुणाकडे किती आमदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी आली समोर, पहा कोण ठरलं सरस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राज्यात पडले आहे.

सध्या कोणाकडे सर्वात जास्त आमदार-खासदार आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बुधवारी दोन्ही गटांची बैठक झाली होती. त्यामध्ये अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचा आकडा असल्याचे समोर आले आहे. सध्या अजित पवारांकडे ३३ आमदार आहेत. तर शरद पवारांकडे १८ आमदार आहेत.

अशात नवाब मलिक आणि सरोज अहिरे या दोन आमदारांनी आपण कोणाच्या गटात हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सध्यातरी ५४ पैकी ३३ आमदार अजित पवारांकडे असल्याने त्यांनीच या लढ्यात बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.

बुधवारी जी बैठक झाली होती त्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह त्यांच्या गटात गेलेल्या ९ आमदारांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. तसेच इतर आमदार आमच्याच सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले होते. पण बैठकीत अजित पवारांकडे ३३ आमदार असल्याचे समोर आले.

अजित पवारांच्या बैठकीत विधानसभेतील ३३ आमदारांसह विधानपरिषदेतील रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण विक्रम काळे हे आमदार उपस्थित होते. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे खासदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांकडे संख्याबळ जास्त असल्याचे समजते. तसेच कोणाकडे कोणते आमदार आहे याचीही यादी आता समोर आली आहे.

अजित पवार गट- छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील, बाळासाहेब आजबे, राजू कारेमोरे, आशुतोष काळे, माणिकराव कोकाटे, मनोहर चंद्रिकापुरे, दिपक चव्हाण, संग्राम जगताप.

नरहरी झिरवळ, सुनिल टिंगरे, इंद्रनील नाईक, शेखर निकम, नितीन पवार, बाळासाहेब पाटील, राजेश पाटील, दिलीप बनकर, अण्णा बनसोडे, अतुल बेनके, दत्तात्रय भरणे, यशवंत माने दिलीप मोहिते, निलेश लंके, बबनराव शिंदे, सुनील शेळके, प्रकाश सोळंके, देवेंद्र भोयार हे सर्व विधानसभेतील आमदार आहे.

शरद पवार गट- जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, मकरंद पाटील, प्राजक्त तनपुरे, चेतन तुपे, चंद्रकांत नवघरे, रोहित पवार, सुमन पाटील, सुनिल भुसारा, किरण लहामटे संदीप क्षीरसागर, मानसिंग नाईक, दौलत दरोडा हे विधानसभेतील आमदार आहे.

तसेच एकनाथ शिंदे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंंदे हे विधानपरिषदेतील आमदार आहे. तर श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे वंदना चव्हाण आणि फौजिया खान हे खासदार शरद पवारांकडे आहे.