ताज्या बातम्याक्राईम

Swargate : “तो मला सतत फोन आणि मेसेज करायचा….” स्वारगेट प्रकरणात तरूणीचा धक्कादायक गौप्यस्फोट

Swargate : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी त्याच्या मित्रमंडळींची चौकशी सुरू केली असून, या तपासादरम्यान आरोपीच्या मैत्रिणीने काही धक्कादायक माहिती उघड केली आहे.

मैत्रिणीच्या सतत त्रासाला कंटाळून पोलिसांना दिली माहिती

पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीच्या मैत्रिणीने सांगितले की, गाडे तिला सतत फोन आणि मेसेज करायचा. तो तिला भेटण्याचा आग्रह धरायचा आणि तिच्या मैत्रिणींशी ओळख करून देण्यास सांगायचा. इतकेच नव्हे, तर “त्यांच्याशी माझं पॅचअप करून दे,” अशी मागणी तो वारंवार करत होता. यामुळे त्रस्त झालेल्या मैत्रिणीने अखेर पोलिसांना माहिती पुरवली आहे.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम

गेल्या दोन दिवसांपासून गाडे फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी १३ पथकं तैनात केली आहेत. पोलिसांनी २६ फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या १० ते १२ मित्रांना चौकशीसाठी बोलावले होते. तसेच, शिरूर येथील त्याच्या घरावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्यांचीही कसून चौकशी सुरू आहे.

फोरेन्सिक तपासणीसाठी बस जप्त

स्वारगेट बस स्थानकात ज्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली, ती बस फोरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे. तपासातून आणखी काही महत्त्वाची पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

याआधीही गुन्हेगारी इतिहास असलेला आरोपी

दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वीही महिलांना लुबाडण्याचे गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये त्याने प्रवासी वाहतूक करण्यासाठी घेतलेल्या चारचाकी गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना फसवल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांचा सर्च ऑपरेशन वेगवान

स्वारगेट प्रकरणानंतर आरोपी फरार झाला असला तरी पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या लपण्याच्या शक्य ठिकाणी छापे टाकले जात आहेत. लवकरच आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षेची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button