ताज्या बातम्या

Manav Sharma : “मी अभिषेकसोबत संबंध ठेवले होते”, TCS मॅनेजर मानव शर्माच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट

Manav Sharma : TCS कंपनीचे मॅनेजर मानव शर्मा यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी निकिता शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निकिता स्वतःला दोषी ठरवत आहेत आणि त्यांच्या भूतकाळाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत.

निकिता शर्माने व्हिडिओमध्ये काय म्हटले?

व्हायरल व्हिडिओमध्ये निकिता यांनी मान्य केले की, लग्नापूर्वी त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात होत्या. मात्र, मानव शर्माकडून त्यांनी हा भूतकाळ लपवला होता.

त्या म्हणतात, “मी अभिषेकसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. लग्नाच्या आधी मानवला त्याच्याबद्दल सांगितले होते, पण सेक्सबद्दल कधीच सांगितले नाही. लग्नानंतर त्यांनी वारंवार विचारल्यानंतरच मी सत्य कबूल केले.”

इतकेच नाही, तर निकिता यांनी त्यांच्या मामावरही गंभीर आरोप लावले. त्या म्हणाल्या, “माझ्या मामानेही माझ्यासोबत गैरवर्तन केले होते. मला माहित आहे की मी खूप चुकीचे केले, मानवला खोटे सांगितले, पण मी हे सर्व त्याला गमवायचे नव्हते म्हणून केले.”

TCS मॅनेजर मानव शर्माने आत्महत्या का केली?

२४ फेब्रुवारी रोजी मानव शर्माने आग्रा येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी ६ मिनिटे ५७ सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये ते रडत म्हणत होते, “द ला नीड टू प्रोटेक्ट मॅन… कृपया पुरुषांबद्दल कुणीतरी बोला, ते खूप एकटे पडतात.”

मानव यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि निकिता शर्मा व त्यांच्या कुटुंबावर छळाचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणात निकिता शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मानव शर्माच्या वडिलांचा आरोप

मानव यांच्या वडिलांचे म्हणणे आहे की, “निकिता रोज भांडण करत होती आणि आत्महत्येची धमकी देत होती. त्यामुळे मानव भीतीने ग्रासला होता की, जर निकिताने काही केले, तर आम्ही अडचणीत येऊ. या दडपणामुळे त्याने हे पाऊल उचलले.”

निकिता शर्माचा बचाव

निकिता शर्माने स्वतःचे समर्थन करताना सांगितले की, “मानव यांना दारूचे व्यसन होते आणि ते स्वतःलाच इजा करत असत. त्यांनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना वाचवले. त्यांच्या आई-वडिलांना याची कल्पना दिली होती, पण त्यांनी याला पती-पत्नीतील खाजगी प्रकरण मानले आणि दुर्लक्ष केले.”


प्रकरणाचा पुढील तपास सुरू

मानव शर्माच्या आत्महत्येनंतर ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, निकिता शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button