Dattatreya Gade : दत्ता गाडे विवाहित, मुलंबाळं असूनही का ठेवले समलिंगी संबंध? हादरवणारे कारण आले समोर

Dattatreya Gade : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो परिसरात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा गुन्हेगारी इतिहास आता समोर येऊ लागला आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असलेला गाडे हा शेतकरी कुटुंबातील असूनही शेतीकडे लक्ष देत नव्हता. तो बेरोजगार होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहत असे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
तपासादरम्यान गाडे याने यापूर्वीही महिलांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. महिलांच्या दागिन्यांची लूट, विनयभंग आणि महिलांना अज्ञातस्थळी नेऊन लुबाडणे असे गुन्हे त्याने यापूर्वी केले आहेत. तसेच, त्याने समलैंगिक संबंधांद्वारे पैसे कमावल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.
याआधीही तो श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागातील बस आणि रेल्वे स्थानकांवर फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली असता, त्याच्या भावालाच चुकून ताब्यात घेतले होते, मात्र शहानिशा झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. “वाट पाहीन पण एसटीनेच जाईन” असा एसटी सेवेवर असलेला महिला प्रवाशांचा विश्वास हादरला आहे. रात्रीच्या प्रवासाचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सार्वजनिक वाहतूक महिलांसाठी कितपत सुरक्षित आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर नवा प्रश्नचिन्ह निर्माण केला असून, अशा गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.