ताज्या बातम्याक्राईम

Mumbai : मुंबई हादरली! १२ वर्षाच्या मुलीवर ५ नराधमांनी केले अत्याचार, पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अद्याप थांबले नाहीत, तोच आता मुंबईतील जोगेश्वरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पाच नराधमांनी मिळून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला दादर येथे सोडले

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हे एसी मेकॅनिक असून, त्यांनी मुलीला एकटे पाहून फसवले आणि घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला दादर परिसरात सोडून दिले. मुलगी एकटी फिरत असताना पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने संपूर्ण प्रकार उघड केला.

पोलिसांची तत्काळ कारवाई, पाच जण ताब्यात

मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि पाचही आरोपींना शोधून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईसाठी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडितेची आणि आरोपींची पूर्वी ओळख होती का? हा मुद्दा तपासला जात आहे.

राज्यात महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न

या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट आगारात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्या प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र, सातत्याने वाढणाऱ्या अशा घटनांमुळे महिला सुरक्षेची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र निर्माण झाले आ

Related Articles

Back to top button