---Advertisement---

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांच्या साडूचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बाभुळवाडी गावात अमानूष मारहाण

---Advertisement---

Dhananjay Deshmukh : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर खळबळ उडाली असताना, बीडमध्ये आणखी एका मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावात एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचा हा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सरपंच दादा खिंडकर मारहाणीच्या व्हिडिओत?

या मारहाणीच्या व्हिडिओमध्ये दिसणारी प्रमुख व्यक्ती म्हणजे बेडूकवाडी गावाचे सरपंच दादा खिंडकर आहेत. विशेष म्हणजे, ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, त्यांच्या या मारहाणीच्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोणीही असो, नातेवाईक असो किंवा कोणीही, योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.” तसेच, “या प्रकरणात ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांनीच उत्तर द्यावे,” असेही त्यांनी सांगितले.

सरपंच दादा खिंडकर अडचणीत?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दादा खिंडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. बीडमध्ये सलग समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे *कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---