Gujarat : 100 च्या स्पीडने गाडी ठोकली, एकाला मारलं, धनिकपुत्र अपघातानंतर बोलत राहिला; ओम नम: शिवाय

Gujarat : वडोदरा: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने भीषण अपघात घडवला. करेलीबाग परिसरातील आम्रपाली चौकाजवळ झालेल्या या दुर्घटनेत ४९ वर्षीय हेमालीबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने येत होती आणि तिने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. अपघातात १२ वर्षीय जैनी, ३५ वर्षीय निशाबेन, १० वर्षीय मुलगा आणि ४० वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नशेत तरुणाचा रस्त्यावर गोंधळ
अपघातानंतर गाडीचा चालक रक्षित चौरासिया हा नशेत धुंद अवस्थेत गाडीतून उतरला. तो “अनदर राऊंड, अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता” असे मोठ्याने ओरडत होता. त्याच्या वर्तनाने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर तो “ओम नम: शिवाय” अशा घोषणा देऊ लागला. अखेर जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघाताचा वेग १०० किमी प्रतितास, पोलीस तपास सुरू
तपासात समोर आले की, अपघाताच्या वेळी कार ताशी १०० किमी वेगाने धावत होती. कारमधील एअरबॅग्ज उघडल्याने चालक रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांचा जीव वाचला. रक्षित हा वडोदऱ्यातील एम.एस. विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता. अपघातानंतर त्याच्या शेजारी बसलेला मित्र कारमधून लगेच उतरला. ही कार त्याचा मित्र प्रांशू चौहान यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

पोलिसांनी रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने केवळ मद्यपान केले होते की अंमली पदार्थांचे सेवनही केले होते, याचा तपास सुरू आहे. या अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत आणि कठोर कारवाईची मागणी करत आहेत.वडोदऱ्यात मद्यधुंद तरुणाने भरधाव कारने उडवले अनेकजण; एका महिलेचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

वडोदरा: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने भीषण अपघात घडवला. करेलीबाग परिसरातील आम्रपाली चौकाजवळ झालेल्या या दुर्घटनेत ४९ वर्षीय हेमालीबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने येत होती आणि तिने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. अपघातात १२ वर्षीय जैनी, ३५ वर्षीय निशाबेन, १० वर्षीय मुलगा आणि ४० वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नशेत तरुणाचा रस्त्यावर गोंधळ
अपघातानंतर गाडीचा चालक रक्षित चौरासिया हा नशेत धुंद अवस्थेत गाडीतून उतरला. तो “अनदर राऊंड, अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता” असे मोठ्याने ओरडत होता. त्याच्या वर्तनाने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर तो “ओम नम: शिवाय” अशा घोषणा देऊ लागला. अखेर जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघाताचा वेग १०० किमी प्रतितास, पोलीस तपास सुरू
तपासात समोर आले की, अपघाताच्या वेळी कार ताशी १०० किमी वेगाने धावत होती. कारमधील एअरबॅग्ज उघडल्याने चालक रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांचा जीव वाचला. रक्षित हा वडोदऱ्यातील एम.एस. विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता. अपघातानंतर त्याच्या शेजारी बसलेला मित्र कारमधून लगेच उतरला. ही कार त्याचा मित्र प्रांशू चौहान यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

पोलिसांनी रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने केवळ मद्यपान केले होते की अंमली पदार्थांचे सेवनही केले होते, याचा तपास सुरू आहे. या अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत आणि कठोर कारवाईची मागणी करत आहेत.