---Advertisement---

Gaganyaan project : लष्करी अधिकाऱ्याशी फेसबुकवर मैत्री करून प्रेमात फसवलं; भारताच्या गगनयान प्रोजेक्टची सीक्रेट माहिती लीक

---Advertisement---

Gaganyaan project : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) आग्रा येथील ऑर्डिनेंस फॅक्टरीत काम करणाऱ्या फिरोजाबादच्या रविंद्र कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. त्यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला गोपनीय लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पुरवण्याचा गंभीर आरोप आहे. तपासात समोर आले आहे की, ISI च्या महिला एजेंटने “हनीट्रॅप”चा वापर करत सोशल मीडियावर रविंद्र कुमारशी मैत्री केली आणि त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप

ISI च्या एका महिला एजंटने “नेहा शर्मा” नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आणि रविंद्र कुमारशी संपर्क साधला. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि मैत्रीचे रूपांतर विश्वासात झाले. त्यानंतर महिलेकडून पैशांचे आमिष दाखवण्यात आले आणि रविंद्र कुमारकडून भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुप्त कागदपत्रे मिळवण्यात आली.

गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवली

तपासात उघड झाले आहे की, रविंद्र कुमारने ऑर्डिनेंस फॅक्टरीचा डेली प्रोडक्शन रिपोर्ट, स्क्रिनिंग कमिटीचे दस्तऐवज तसेच ड्रोन आणि गगनयान प्रकल्पासंबंधित महत्त्वाची माहिती ISI ला पाठवली. त्यांच्या मोबाईलमध्ये लष्कर आणि ऑर्डिनेंस फॅक्टरीशी संबंधित गुप्त दस्तऐवज आणि ५१ गुरखा रायफल्सच्या अधिकाऱ्यांची माहिती आढळून आली. ही सर्व माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवली जात होती.

देशविरोधी नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता

UP ATS ने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. रविंद्र कुमार आणि त्यांच्या संपर्कात असणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले असून, देशभरातील ISI नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---