Pune : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतले आहे. तपासामध्ये समोर आले आहे की, टेम्पो चालक जनार्धन हंबर्डेकरने तीन कर्मचाऱ्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गाडीला आग लावली होती. मात्र, ज्यांना मारायचं होते, ते वाचले आणि निष्पाप चार लोकांचा बळी गेला.
हंबर्डेकरने दिवाळी बोनस आणि पगार थकवल्यामुळे, तसेच चालक असून मजुरीचे काम दिल्यामुळे संतापून हा कट रचला. पोलिसांच्या तपासात हंबर्डेकरचा कट उघड झाला आहे. चालक जनार्धन हंबर्डेकरने तपासात सांगितले की, कंपनीतील काही कर्मचार्यांशी असलेल्या वागणुकीमुळे त्याला राग आले होते.
दिवाळी बोनस कट केले गेले होते, तसेच चालक असूनही खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, यामुळे त्याच्या मनात चिड निर्माण झाली. तो मागील आठवड्यात जेवणाचा डबा देखील मिळाल्याचं सांगतो. यामुळे त्याच्या रागाचे शिकार कंपनीतील तिघे कर्मचारी झाले होते, पण निसर्गाने त्याच्या इराद्याला धक्का दिला आणि निष्पाप चार जणांचा बळी गेला.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे आणि संताप व्यक्त केला जात आहे. हिंजवडीतील या धक्कादायक घटनेत जळालेल्या टेम्पोमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत:
मृत्युमुखी पडलेले कर्मचारी:
- सुभाष भोसले (42 वर्षे)
- शंकर शिंदे (60 वर्षे)
- गुरुदास लोकरे (40 वर्षे)
- राजू चव्हाण (40 वर्षे)
जखमी कर्मचारी:
- प्रदीप राऊत
- प्रवीण निकम
- चंद्रकांत मलजीत
- संदीप शिंदे
- विश्वनाथ झोरी
- जनार्दन हंबर्डेकर (टेम्पो चालक)
घटनेतील इतर तपशील सांगितले जात आहेत की, जळालेल्या गाडीतून कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झगडले, आणि गाडीच्या दरवाज्याला ओरबाडून उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. घटनास्थळी आढळलेल्या जळालेल्या सीट आणि खालच्या दर्जाच्या वस्तू एक मोठा हादरा देत आहेत.