अजित पवारांच्या बंडामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. याचा परिणाम दुसऱ्या पक्षांवरही होताना दिसून येत आहे. आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
नीलम गोऱ्हे शिवसेनेत जात असल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड एक वर्षाआधी बंड केले होते. त्यानंतर त्यांना शिवसेना नाव आणि चिन्हही मिळाले. त्यामुळे त्यांच्या गटात अनेक नेते सामील झाले.
अशात अनेक नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले. पण आता विधानपरिषदेच्या आमदार नीलम गोऱ्हे या सुद्धा शिवसेनेत जाणार आहे. त्या विधानपरिषदेच्या उपसभापती सुद्धा आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
एक निष्ठावर नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे यांच्याकडे बघितलं जातं. पण आता त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील रणरागिणी म्हणून ओखळल्या जातात. पण त्याच ठाकरे गटाला रामराम ठोकताना दिसत आहे.
ठाकरे गटात सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाकडून काही जबाबदाऱ्याही देण्यात आल्या. त्यामुळे इतर महिला नेत्या म्हणजेच दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या नाराज झाल्या होत्या.
पक्षाबद्दलची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे यांनी आधीच ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. पण आता नीलम गोऱ्हे यादेखील पक्ष सोडत आहे. ठाकरे गटाकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. पण त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत होता.