छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे आरोपीने तरुणाची हत्या केल्यानंतर पत्नीवर बलात्कार केला. मणिपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302, 376, 506 अन्वये कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पती-पत्नी झोपले असताना आरोपी सुखलालच्या घरी पोहोचला होता. मध्यरात्री त्याला पाहून पतीला पत्नीशी अवैध संबंध असल्याचा संशय आला. यादरम्यान वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी सुखलालचा काठीने वार करून खून केला. यानंतर पत्नीवर धमकी देऊन रात्रभर बलात्कार केला.
आश्चर्यकारक बाब म्हणजे आरोपी ज्यावेळी बलात्कार करत होता, त्या वेळी पीडितेच्या पतीचा मृतदेह त्याच्या शेजारीच पडला होता. वास्तविक, जशपूरचे रहिवासी असलेले ४२ वर्षीय सुखलाल अंबिकापूर शहरातील मणिपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दरीपारा येथे एका बांधकाम सुरू असलेल्या घरात राहत होते.
त्याने पत्नी म्हणून एका महिलेला सोबत ठेवले होते. सोमवारी रात्री सुखलाल आणि त्यांची पत्नी जेवण करून झोपले होते. दरम्यान, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पूर्वीचा ओळखीचा कार्तिक कोरवा (21) हा शांतपणे सुखलालच्या घरात घुसला. हे पाहून सुखलालला कार्तिकचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय आला.
यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान कार्तिकने सुखलालवर काठीने वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने सुखलालच्या पत्नीला धमकी देऊन तिच्यावरही बलात्कार केला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मृताच्या पत्नीने मणिपूर पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी कार्तिक कोरवा याला अटक केली आहे, जो दरिमा पोलीस स्टेशन हद्दीतील पंपापूर गावात राहणारा आहे.