भालचंद्र नेमाडे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आहेत. पण ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा त्यांनी असे एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यांनी औरंजेबाबत वक्तव्य केलं आहे.
काशी विश्वेश्वराला गेलेल्या औरंगजेब बादशाहाच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं होतं. हे जेव्हा औरंगजेबाला कळालं होतं. तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली होती, असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे.
सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब हा पहिला राजा होता. तसेच दुसरा बाजीराव वगळता बाकीचे सर्व पेशवे दुष्ट होते, असेही भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्याच्या या वक्तव्यावरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्यातर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सव सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भालचंद्र नेमाडे यांनाही बोलवण्यात आली होते. यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरुन वाद होत आहे. अधिवेशनातही याबाबत वाद होताना दिसून आले. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांनी याविषयावर भाष्य केलं आहे. तसेच खरा इतिहास वाचत जा, असा सल्लाही भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे. यावेळी मंचावर शरद पवारही उपस्थित होते.
त्याकाळी बऱ्याच मुस्लिम राजांच्या हिंदु राण्या होत्या. पण त्यावेळी जास्त भेदभाव होत नसायचा. औरंजेबाच्याही दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशी विश्वेश्वराला दर्शनाला गेल्या होत्या. पण त्या परत आल्याच नाही, असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे.
तसेच याबाबत औरंगजेबाला कळले. त्यावेळी चौकशी केली तर असे कळले की काशी विश्वेश्वारामध्ये एक भुयार होतं. तिथे नेऊन पंडीत बायकांना भ्रष्ट करायचे. हे औरंगजेबाला कळल्यानंतर त्याने तिथली तोडफोड केली. असली माणसं नको म्हणून त्याने त्यांना मारलं होतं. पण पुढे इतिहासात हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. त्याच्या सैन्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू होते, असेही नेमाडे यांनी म्हटले आहे.