शिंदेगटात होणार मोठा भूकंप, १७ ते १८ आमदार ठाकरेंच्या संपर्कात; वाचा पडद्यामागे नेमकं काय घडतय…

अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले आहे. अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली आहे. पण अजित पवार यांच्या येण्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याचे समोर येत आहे.

अजित पवार निधी देत नव्हते, असा सूर शिंदेंच्या आमदारांनी महाविकास आघाडीमध्ये असताना लावला होता. तसेच राष्ट्रवादीचे कारण सांगतच त्यांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण आता राष्ट्रवादी पुन्हा त्यांच्याच सोबत सत्तेत येऊन बसली आहे.

राष्ट्रवादी आल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार हे खुप नाराज असल्याची चर्चा आहे. कारण अनेक आमदारांची मंत्रिपदंही राष्ट्रवादीमुळे जाणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील काही आमदार हे पुन्हा ठाकरे गटासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. काही आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटातील ७ ते ८ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीला आमचा विरोध होता, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो होतो. पण आता आम्हाला परत यायचं आहे, आम्हाला परत पक्षात घ्या, अशी विनवणी शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंना केली आहे.

अजित पवारांसह अनेक राष्ट्रवादीचे आमदार हे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये खुप अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच मंत्रिपदावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचीही माहिती मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे नाराज होऊन पुन्हा ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.

अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहे. तसेच आजही आम्हाला ४ आमदारांनी संपर्क केला होता. त्यांना पुन्हा आमच्याकडे यायचे आहे. पण याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.