विरोधातील बातमीमुळे संतापला शिंदे गटातील आमदार; भर रस्त्यात पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बातमी छापल्यामुळे त्यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिली होती. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

किशोर पाटील त्याच्यावर खुप आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. तसेच शिवीगाळ करत धमकी सुद्धा दिली होती. त्याच पत्रकाराला आता मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर त्या पत्रकाराचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.

संदीप महाजन असे त्या पत्रकाराचे नाव आहे. त्याने किशोर पाटील यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. संदीप महाजन यांना शिवीगाळ करत किशोर पाटील यांनी धमकी दिली होती.

मिळालेल्या धमकीनंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे संदीप महाजन यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणीही केली होती. आपल्याला काहीही झाल्यास त्याला किशोर पाटील हेच जबाबदार असतील असेही संदीप महाजन यांनी म्हटले होते.

अशातच गुरुवारी सकाळी संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. किशोर पाटील समर्थकांनीच मला मारहणा केली आहे, असे संदीप महाजन यांनी म्हटले आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे. आता तरी मला संरक्षण द्यावे, असे संदीप महाजन यांनी म्हटले आहे.

याप्रकरणाला सुरुवात जळगाव जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे झाली होती. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा जीव घेण्यात आला होता. यावरुन संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी एक बातमी लिहीली होती. ती बातमी आवडली नसल्यामुळे किशोर पाटील यांनी महाजन यांना धमकी दिली होती.